Quantcast
Channel: Mumbai Hikers
Viewing all articles
Browse latest Browse all 3992

१४ वे गिरिमित्र संमेलन - 'दुर्गसंवर्धन विषय व्याप्ती

$
0
0



१४ वे गिरिमित्र संमेलन
मध्यवर्ती संकल्पना - दुर्गसंवर्धन
११ - १२ जुलै २०१५, महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड

नमस्कार गिरिमित्रांनो...
आपणास माहीतच आहे की १४ व्या गिरिमित्र संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना 'दुर्गसंवर्धन'अशी ठेवण्यात आली आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगात भटकणा-या डोंगरवेड्यांच्या अनेक संस्था आपआपल्यापरीने गेली ४० वर्षे संवर्धनाची भरपूर कामं करत आहेत. टाकेसफाई, वास्तूंची सफाई, गडवाटांची सफाई, वृक्षारोपण अशा विविध कामांचा त्यामध्ये सहभाग असतो. अर्थात या कामाला मर्यादा असल्यातरी ऐतिहासिक जाणीवेपोटी, सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून हे काम सुरु असते. गेल्या १०-१५ वर्षात अशा कामांची व्याप्ती खूपच वाढली आहे.
दुर्गप्रेमींच्या या कामाला प्रोत्साहन देणे, त्यांच्यामध्ये पुरातत्त्वीय दृष्टीकोन विकसित करणे, त्यांना पुरातत्त्वीय नियमांची जाणीव करुन देणे, शासकीय कामात त्यांचा सहभाग कसा वाढू शकेल हे पाहणे आणि नियमांच्या चौकटीत राहूनदेखील संवर्धनाचे कार्य पुढे कसं नेता येईल यावर विचारमंथन करुन उपाय शोधणे हेच या संमेलनाचे उद्दीष्ट आहे.

पुरातन वास्तू विषयक दृष्टीकोन 
१) गडांवरील वास्तूंकडे पाहण्याचा पुरातत्वीय दृष्टीकोन.
२) गडांवरील वास्तूंचे ऐतिहासिक संदर्भ, महत्व शोधणे व विश्लेषण करणे.
३) नोंदी, छायाचित्रांचा नेमका वापर.
४) पुरातत्व विषय प्राथमिक शैक्षणिक अभ्यासक्रम.
संवर्धनाची कामे 
खालील उपक्रम अनेक संस्थांकडून नियमितपणे केले जातात. त्यासंदर्भात नेमकी कोणती काळजी घ्यावी.
१) गड-किल्ल्यांची सर्वसाधारण स्वच्छता.
२) गडावरील टाकी-तलाव सफाई.
३) गडावरील वास्तूंवर उगवलेली झाडे झुडपे काढणे.
४) गडावरील क्लिअरिंग कामे.
पुरातत्त्व नियम व संकेत 
१) पुरातन वास्तू जतन व संवर्धनाबाबतचे कायदे व नियम.
२) गडावरील पडलेल्या वास्तूंचे दगड व इतर अवशेष जतनाबाबत नियम व संकेत.
३) सापडलेल्या पुरातन वास्तूंबाबत नियम व कार्यप्रणाली.
४) गड-किल्ल्यांवरील मोकळ्या जागेवर वृक्षारोपण करण्याबाबत नियम व संकेत.
५) गडावरील दुर्ग यात्रींच्या मुक्कामाबाबत नियम व संकेत.
६) गड-किल्ले व पुरातन वास्तूंबाबत काय करावे व काय करू नये याबाबत संकेत.
७) गडावरील देव-देवता, मंदिरे यांचे जतन व दुरुस्तीबाबत नियम व संकेत.
८) दुर्ग संवर्धन करणा-या संस्थांना करता येणारी संवर्धन कामे.
९) पुरातत्व खात्याच्या सहकार्याने दुर्गसंवर्धन संस्थांना करता येणारी संवर्धन कामे.
१०) दुर्ग संवर्धन करणा-या संस्थांनी करू नयेत अशी संवर्धन कामे.
उत्खनन 
१) पुरातत्व स्थळाचे उत्खनन म्हणजे नेमके काय?
२) उत्खनानाची नेमकी वाख्या.
३) आजवरच्या उत्खननातून आढळलेल्या बाबी.
४) गिर्यारोहक गडांवर करत असलेल्या कामांचा समावेश उत्खननात होतो का?
५) होत असेल तर त्यामुळे त्याचे परिणाम काय होऊ शकतात?
६) गडावरील कामांमध्ये गिर्यारोहकांनी घ्यावयाची काळजी.
७) उत्खननाच्या कामात गिर्यारोहकांची मदत कशी घेता येईल.
नकाशा 
१) गड-किल्ल्यांच्या नकाशाचे महत्त्व.
२) संवर्धन आणि नकाशा विश्लेषण.
३) नकाशा करण्याची पद्धत.
संवर्धन व्यवस्थापन (बांधकाम इ.)
१) संवर्धन व्यवस्थापन म्हणजे नेमके काय?
२) संवर्धन व्यवस्थापनाची गरज.
३) गडांचे संवर्धन व्यवस्थापन नेमकं काय?
४) गडावरील पडलेल्या वास्तूंची डागडुजी, दुरुस्ती व पुर्नबांधणी संदर्भात गिर्यारोहकांनी घ्यावयाची काळजी.
पुरातत्त्वीय दृष्टीकोन 
१) गडकिल्ल्यांबाबतचा पुरातत्व खात्याचा दृष्टीकोन.
२) गडकिल्ल्यांबाबत गिर्यारोहकांनी बाळगायचा पुरातत्वीय दृष्टीकोन.
३) राज्याच्या पुरातत्त्व व वस्तूसंग्रहालय संचालनालयाचे उपक्रम.
लेणी -
१) लेणींकडे पाहण्याचा पुरातत्त्वीय दृष्टीकोन.
२) नेहमीच्याच ट्रेकमध्ये सहजपण अभ्यासता येतील अशा काही टिप्स.
३) लेणी दस्तऐवजीकरण आणि संवर्धन यासंदर्भात मार्गदर्शन.
कार्यक्रमाचे सविस्तर वेळापत्रक लवकरच देत आहोत. संमेलनात सहभागी होण्यासाठी आपली नावनोंदणी त्वरीत करावी.
संपर्क - महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड, 022 – 25681631, मुकेश मैसेरी 9869021621 प्रसाद जोशी 9920806699


धन्यवाद 

अॅड. रवि परांजपे, 
संमेलन प्रमुख
१४ वे गिरिमित्र संमेलन


Viewing all articles
Browse latest Browse all 3992

Trending Articles