नमस्कार गिरिमित्रांनो,
आपण डोंगरभटके आपल्या अमूल्य अशा ऐतिहासिक ठेव्याची जाण ठेऊन गेल्या २५-३० वर्षांपासून गडकोटांच्या संवर्धनासाठीआपापल्यापरीने योगदान देत आहोत. आपल्या कामाला मर्यादा आहेत हे जरी मान्य केले तरी ऐतिहासिक जाणीवेपोटी, सामाजिक बांधिलकी जोपासत केले जाणारे हे काम कौतुक करण्यासारखेच आहे. अर्थातच गरज आहे ती सर्वांना प्रोत्साहन देत, संवर्धनाच्या या कामाला योग्य दिशा देण्याची. त्यांना एकत्रित आणण्याची आणि त्यातूनच ह्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनात एकसूत्रता आणण्याची. म्हणूनच दिनांक ११ व १२ जुलै रोजी महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड येथे संपन्न होणा-या १४ व्या गिरिमित्र संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना ही 'दुर्गसंवर्धन'अशी ठेवण्यात आली आहे.
मध्यवर्ती संकल्पनेला अनुसरुन १४ व्या गिरिमित्र संमेलनात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्त्व व वस्तू संग्रहालय संचालनालयाचे माजी संचालक डॉ. अरविंद जामखेडकर हे संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. तसेच पुरातत्त्व क्षेत्रातील मान्यवर तज्ञ व्यक्ती आणि संबधित सरकारी खात्यातील अधिकारीदेखील याप्रसंगी उपस्थित असतील आणि आपणास मार्गदर्शन करतील.
सर्वसाधारण रुपरेषा
दिनांक ११ जुलै २०१५ - सायंकाळी ५.०० ते ९.००
- दृक्श्राव्य सादरीकरणातील निवडक सादरीकरणे.
- दुर्गसंवर्धन या विषयावर पुरातत्त्ववेत्ते, सरकारी अधिकारी यांच्याशी खुली चर्चा, प्रश्नोत्तरे
दिनांक १२ जुलै २०१५ - सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.००
- गिरिमित्र सन्मान प्रदान सोहळा.
- मध्यवर्ती संकल्पनेवर आधारीत विशेष कार्यक्रम.
- मध्यवर्ती संकल्पनेवर आधारीत विशेष कार्यक्रम.
- दृक्श्राव्य सादरीकरणातील पारितोषकप्राप्त सादरीकरणे.
- गिर्यारोहण वार्तापत्र (मागील वर्षातील ठळक घडामोडी).
- प्रश्न मंजूषा.
- अभ्यासपूर्ण दृकश्राव्य सादरीकरण.
- पोस्टर आणि छायाचित्र स्पर्धा निवडक कलाकृती प्रदर्शन.
- ट्रेकर्स ब्लॉगर्स, छायाचित्रण, पोस्टर स्पर्धा पारितोषक वितरण.
संमेलन प्रवेशिका देणगी मुल्य रु. ५००/- फक्त (दिनांक ११ जुलै चहा, भोजन, दिनांक १२ जुलै चहा, नाष्टा, भोजन). संमेलनात सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. संमेलनस्थळी केवळ ५०० डोंगरभटक्यांना सामावून घेऊ शकतो. संमेलन प्रवेशिका वितरणात प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य राहील.
दिनांक २ जून २०१५ पासून संमेलनाच्या देणगी प्रवेशिका वितरीत करण्यात येतील.
अधिक माहीतीसाठी संपर्क - मुकेश मैसेरी ******** , प्रसाद जोशी **********
----------------------------------------