Quantcast
Channel: Mumbai Hikers
Viewing all articles
Browse latest Browse all 3992

"पन्हाळा - पावनखिंड - विशाळगड पदभ्रमण मोहीम"

$
0
0

एका जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक मार्गावर पुन्हा मार्गक्रमण करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे



"आयुष्य म्हणजे पावनखिंड, हातात उचललेली मुठभर माती आणि डोळ्यांच्या पाणावलेल्या कडा… "


पावनखिंडीत झालेल्या रक्तलांछित आणि ऐतिहासिक पराक्रमाला ३५१ वर्षे पूर्ण होत आहेत. पन्हाळ्यावरून महाराजांची सुखरूप सुटका करून, मागे लागलेल्या सैन्याला घोडखिंडीत अडवून लढता लढता पराक्रमी सरदार बाजीप्रभू देशपांडे आणि मावळ्यांनी बलिदान दिले. महाराज विशाळगडावर पोहोचेपर्यंत हा लढा चालूच होता. फक्त ३०० बांदल मावळ्यानिशी शत्रूच्या हजारो सैन्याशी सामना करण्याचा अतुलनीय पराक्रम आजही घोडखिंडीला पावनखिंड बनवून साक्ष देत आहे.


शिवरायांचा पन्हाळा ते विशाळगड प्रवास , वीर शिवा काशीद यांचे बलिदान, वीर बाजीप्रभू आणि मावळ्यांचा पराक्रम, असे खूप प्रश्न पडतात… या आणि अश्या भरपूर प्रश्नांची उत्तरे शोधायला, पन्हाळा ते विशाळगड असा शिवरायांनी केलेला प्रवास अनुभवायला, पावनखिंडीत धारातीर्थी पडलेल्या मावळ्यांना मानवंदना देण्यासाठी आपला गडवाट परिवार " पन्हाळा ते विशाळगड पदभ्रमण मोहीम" आयोजित करत आहे.


==============================


गडवाट आयोजित "पन्हाळा - पावनखिंड - विशाळगड पदभ्रमण मोहीम" !! दिनांक ९ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट २०१३

मोहिमेचे शुल्क : ९००/- (कोल्हापूर ते पन्हाळा-विशालगड ते कोल्हापूर प्रवास)


प्रवासाचा आराखडा : ट्रेक सगळ्यांसाठी कोल्हापूरहून सुरुवात होणार आहे...


:: दिनांक ९ ऑगस्ट :: कोल्हापूर स्थानकातून पन्हाळा गडाखाली बसने पोहोचणे. सकाळचा नाश्ता

==============================

पन्हाळा गडाखाली वीर शिवा काशीद यांच्या समाधीचे दर्शन ==============================

पन्हाळा, गड भ्रमंती, पुस्ती बुरुजावरून उतरून पद भ्रमण मोहीम सुरु.

तुरुकवाडी - म्हाळुंगे गाव - म्हसाई पठार - म्हसाई देऊळ - कुंभारवाडी

दुपारचे जेवण आणि थोडा आराम,

परत प्रवास सुरु, चाफे वाडी - मंडलाई वाडी करून करपे वाडी.

करपे वाडी मध्ये रात्रीचा मुक्काम आणि जेवण यासाठी थांबणार.

रात्रीचा मुक्काम गावातील घरात होईल...


:: दिनांक १० ऑगस्ट :: करपे वाडी मधून सकाळी चहा/ नाश्ता करून पदभ्रमण सुरु करपे वाडी - पाटेवाडी - पांढरपाणी पांढरपाणी येथे दुपारचे जेवण आणि थोडा आराम, परत प्रवास सुरु - पांढरपाणी ते पावन खिंड

==============================

पावन खिंड येथे थांबून वीर बाजीप्रभू देशपांडे आणि मावळ्यांच्या समाधीचे दर्शन आणि आदरांजली. थोडा आराम..

==============================


पावनखिंड येथून निघून विशाळगड कडे प्रवास सुरु विशाळगडावर गडभ्रमंती, गडावरच रात्रीचे जेवण आणि मुक्काम होईल.


:: दिनांक ११ ऑगस्ट ::

विशाळ गडावर सकाळी उठून चहा, नाश्ता करून

गडाखाली उतरून बसने कोल्हापूर स्टेशन गाठणे ...

कोल्हापूर स्टेशनला आल्यावर थोडा वेळ थांबून चर्चा करून

पन्हाळा ते विशाळगड पदभ्रमण मोहीम समाप्त...

=============================


सोबत काय आणाल??


मोहीम ३ दिवसांची असल्याने प्रत्येकाने खाली नमूद गोष्टी सोबत बाळगाव्यात / आणाव्यात. खाली नमूद केलेल्या सर्व गोष्टी गरजेनुसार आणणे बंधनकारक राहील.

१) पाऊस असल्याने रेनकोट अत्यावश्यक

२) पाण्याची बाटली ( २-३ लिटर पाणी असणे )

३) ३ जोडी कपडे ( ३ दिवसांची मोहीम असल्यामुळे ), Toothpaste & Towel

४) Sleeping Mat आणि पांघरून असावे. (थंडी आहे )

५) ताट आणि पाण्याचा ग्लास

६) ओडोमोस, विजेरी (Torch), काही वर्तमान पत्रे

७) मोबाईल सोबत चार्जर पण आणावा.

८) सुखा खाऊ (DryFood), बिस्किटे, प्लम केक इत्यादी.

९) जर कसले औषध वैगेरे चालू असेल तर ती औषधे सोबत बाळगावीत.

१०) प्रवासासाठी उपयुक्त असे बूट

११) हे सगळे मावेल अशी आपल्या सोईप्रमाणे (Comfortable ) अशी Sack

१२) सोन्याचे अथवा महागडे दागिने सोबत ठेवू नये... ठेवल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी स्वत:ची असेल.


हा मौजमजे साठी काढलेला ट्रेक नसून एका जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक मार्गावर पुन्हा मार्गक्रमण करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे … मोहिमेमध्ये सामील होऊ इच्छिणाऱ्या मावळ्यानकडून शिस्तची अपेक्षा आहे …कोणतीहि गैरशिस्त अथवा अतिरेकी साहस सहन केले जाणार नाही … मोहिमेकाळात मोहीम आयोजकांनी घेतलेला निर्णय हाच अंतिम निर्णय असेल त्यावर कोणीही कसलाही वाद घालू नये ।

=====================================


"गडवाट प्रवास सह्याद्रीचा" आयोजित "पन्हाळा - पावनखिंड - विशाळगड" या मोहिमेला आपणास यायचे असेल तर खालील संपर्क क्रमांकावर आपली नाव नोंदणी करणे बंधनकारक आहे. संपूर्ण प्रवासाचे नियोजन करण्यासाठी, आपली नाव नोंदणी होणे गरजेचे आहे...



संपर्क :

सुहास पवार - ९००४०३६५७३

आबासाहेब कापसे - ०९८७०१४०११४

राहुल बुलबुले - ९७६२४५८४७३

जोतीराम गिड्डे - ०९८६७२०६४४६



https://www.facebook.com/gadwat/events


Viewing all articles
Browse latest Browse all 3992

Trending Articles