Quantcast
Channel: Mumbai Hikers
Viewing all articles
Browse latest Browse all 3992

Shivashourya Trekkers Panhalgad to Vishalgad Trek 20th July - 23rd July 2013

$
0
0
सदर मोहिम शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मार्गावरून मार्गक्रमण करत असल्याने मोहिमेत कसल्याही प्रकारचे व्यसन, गैर बोलू अथवा गैर वागू दिले जाणार  नाही, याची सहभागी होणारयानी नोंद घ्यावी. आपली मोहिम ही मौज मजेसाठी निघालेली पिकनिक नसून शिवाप्रेमिंची ही "पंढरीची वारीच" आहे. निसर्गावेडया माणसाला स्वतःचा विसर पडावा अशी निसर्गाची विविध रुपे अनुभवायला मिळणार आहेत. अनेक आयुर्वेदिक पाना-फुलातून, मूळ-खोडातून खळखळ वाहणारे पाणी अमृताहून सरस आहे. शहरातील रस्त्यांच्या दुभाजंकावर स्वताला सावरत चालताना होणारा त्रास इथे शेताच्या बांधावारून चालताना होणार नाही. ओढयातुन चालताना पडल्यावर आपल्या नावाने "गणपति बाप्पा मोर्याची" आरोळी पुढील काही दिवस आपल्या कानात घूमत रहतेच पण अनेक वर्ष ट्रेकच्या  आठवणीचा हिस्सा होते. इतिहासा बरोबर सामाजिक बांधिलकी जपण्याची  "शिवशौर्य ट्रेकर्सची" परंपरा आहे त्या नुसार मुक्कामातील शालेय विद्यार्थना शैक्षणिक साहित्याचे शक्य असेल तसे वाटप केले जाते. आपल्यालाही  आम्ही आवाहन करीत आहोत की तुमच्या घरी  नुसतेच पडून असलेले शैक्षणिक साहित्य उदा. पेन्सिल्स, पेन, वही, चित्रकलेचे साहित्य, गोष्टीची पुस्तके आवर्जुन आपल्या ग्रामीण बान्धवान्साठी  घेउन या. आपला हा ट्रेक संस्मरणीय  असेल.

खालिल लिंक वर क्लिक करा आणि पहा पन्हाळगड़ ते पावनखिंड-विशाळगड़ ऐतिहासिक पदभ्रमण मोहिमेची ध्वनिचित्रफित
http://www.facebook.com/photo.php?v=1924432154770&set=vb.227902413889969&type=2&theater

अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर सम्पर्क साधावा.
९३२०७५५५३९ / ९८६९१०९९७० / ९८१९६६२२५४
ईमेल : shivashourya.trekkers@gmail.com
फेसबुक : http://www.facebook.com/ShivashouryaTrekkers
ब्लोगर : www.shivshouryatrekkers.blogspot.com
पिकासावेब : https://picasaweb.google.com/shivashourya.trekkers (शिवशौर्यचे सर्व ट्रेकफोटो पाहण्यासाठी)



Viewing all articles
Browse latest Browse all 3992

Trending Articles