Mumbai Hikers |
HiTec Trailblazer MID Ankle -Water Proof Shoes Posted: 07 May 2016 04:58 PM PDT When there's no path ahead, when the weather's at its worst, this Trekking shoe will find a way through. It's all down to a durable outsole, a cushioned EVA midsole and OrthoLite® sock liner, and a Dri-Tec waterproof suede and mesh upper. The post HiTec Trailblazer MID Ankle -Water Proof Shoes appeared first on Mumbai Hikers Network. |
गिर्यारोहकांचं हक्काचं व्यासपीठ – गिरिमित्र संमेलन ! Posted: 07 May 2016 03:09 AM PDT नमस्कार गिरिमित्रांनो, कसे आहात? मज्जेत ना? आणि त्यापुढचा आपुलकीचा प्रश्न – डोंगरात जाताय ना? जायलाच हवं… ड़ोंगर भटकंती म्हणजे श्वास आहे आपला !! तर मित्रांनो, दरवर्षी प्रमाणे यावर्षीही आपण भेटणार आहोत – ‘गिरिमित्र संमेलना’च्या निमित्ताने ! यंदाचं संमेलन दि. ९ व १० जुलै २०१६ या दिवशी महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड येथे आयोजित करण्यात आलेलं आहे आणि यंदाची मध्यवर्ती संकल्पना आहे – ‘गिर्यारोहण आणि महिला’. पन्नासच्या दशकातील काही तुरळक उदाहरणे सोडली तर महिला वर्ग फारसा गिर्यारोहणाच्या वाटेला गेला नाही. पण आपल्या महाराष्ट्रात संस्थांच्या माध्यमातून गिरिभ्रमणाचा छंद जोपासणा-या मुलींची संख्या चांगलीच वाढली. ऐंशीच्या दशकात तर काही जिद्दी महिलांनी प्रस्तरारोहण आणि हिमशिखरांवरील आरोहणं देखील यशस्वी केली. लेडीज माउंटेनिअरींग क्लब सारखे केवळ महिलांच्या गिरिभ्रमंतीचे प्रयोगदेखील आपल्याकडे झाले आहेत. बच्छेंद्री पालच्या नेतृत्त्वाखालील भारतीय महिलांच्या चमूने एव्हरेस्टचे आव्हानदेखील यशस्वीपणे झेलेलं. नेहमीच्या सुरक्षित आणि सरधोपट व्यावसायिक क्षेत्राच्या पुढे जाऊन साहसाचे विश्व महिलांना हवहवसं वाटू लागलं. आधी उस्तुकतेपोटी, नंतर आवड म्हणून आणि त्यानंतर एक ध्यास म्हणून कित्येक महिलांनी गिर्यारोहण क्षेत्रात आपला ठसा उमटवला. गेल्या वीस एक वर्षात यात भरपूर बदलदेखील झाले आहेत. या प्रवासातील, वेगळी वाट धरणा-या स्थानिक तसेच जागतिक स्तरावर आपल्या कार्याची मोहोर उमटवणा-या गिर्यारोहक मैत्रीणींना सलाम करण्यासाठीच, आपण घेऊन येत आहोत यंदाचे संमेलन! या अनुषंगाने कार्यक्रमाची तयारी सुरु झाली आहे. विशेष म्हणजे या संमेलनाचे आयोजन देखील प्रामुख्याने महिलाच करत आहेत. याव्यतिरिक्त छायाचित्रण, पोस्टर, ट्रेकर्स ब्लॉग, दृक- श्राव्य सादरीकरण, प्रश्नमंजुषा या स्पर्धाही घोषित करण्यात आलेल्या आहेत. या स्पर्धांची सविस्तर माहिती ‘गिरिमित्र संमेलन’ वेबसाईट व फेसबुक पेज वर मिळवा आणि जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धांमध्ये सहभागी व्हा ! पुढच्याच आठवड्यात संमेलनाच्या प्रवेशिका विक्री सुरु होईल, धन्यवाद – टीम गिरिमित्र Copyright © 2016 Girimitra Sammelan,, All rights reserved. Our mailing address is: The post गिर्यारोहकांचं हक्काचं व्यासपीठ – गिरिमित्र संमेलन ! appeared first on Mumbai Hikers Network. |
You are subscribed to email updates from Mumbai Hikers Network. To stop receiving these emails, you may unsubscribe now. | Email delivery powered by Google |
Google Inc., 1600 Amphitheatre Parkway, Mountain View, CA 94043, United States |