Trek Date:26th May'13
Trail Grade: Medium
Contribution for trail: Rs.500 approx.
Leaders : Siddharth Sawant– 9320353829
Haresh Rane-9029961152
Meeting Point date and Time:26thMay'13 ,7:00AM ,Gateway Of India
Things to carry: 1 ltrs 2 Water bottle, cap, napkin, sun glasses,1 pair of extra cloths(optional)
If you are a member of YHAI then carry your YHAI I-card ( its compulsory). For non members, membership fee Rs.100 is compulsory & one photograph.Please note: good sport shoes (used one) and full pants are compulsory (preferably track pant and not denim/jeans pant) .
For any further details please contact leaders.
भुतकाळात रमायला माणसाला नेहमीच आवडतं. आणि त्यातही भूतकाळ रम्य असेल तर मग सांगायलाच नको ! आपल्या देशाचा भुतकाळही कधी काळी असाच रम्य आणि समृद्ध होता, हे सिद्द करणाऱ्या अनेक खाणाखुणा आपल्याला ठिकठिकाणी दिसत असतात. अरबी समुद्रातील घारापुरी बेटांवरील एलिफंटा लेणी पहात असतानाही याची पदोपदी प्रचिती येते. या ठिकाणी म्हणजे घारापुरी बेटांवर पोहोचण्यासाठी गेट वे ऑफ इंडियापासून अरबी समुद्रात लॉंचने प्रवास सुरु करावा लागतो. लॉंचचा हा प्रवास साधारण तासाभराचा आहे. या एका तासात सागरी प्रवासाचा अविस्मरणीय अनुभव घेता येतो. प्रवासात समुद्रावर विहार करणाऱ्या नानाविध पक्षी-बगळ्यांबरोबरच मुंबईचं दुरुन दिसणारं विहंगम रुपही न्याहाळता येतं. शिवाय बॉम्बे हाय, जेएनपीटी, देशविदेशातील मोठमोठ्या व्यापारी नौका यांचं होणारं दर्शन भारताच्या मोठेपणाची जाणिव करुन देतात. समुद्रात थोडंसं आत गेल्यानंतर सीगल पक्ष्यांचे अनेक थवे लॉंचवर घिरट्या घालायला लागतात. या पक्षांचं वैशिष्ट्य म्हणजे अन्नपदार्थ हवेतच कॅच करण्याची त्यांची क्षमता होय! लॉंचेतील अनेक प्रवासी समुद्रात सीगल पक्ष्यांबरोबर हा खेळ खेळायला सुरुवात करतात. हवेत भिरकावलेल्या शेंगा, बिस्किटे हे सीगल पक्षी हवेतच आपल्या चोचीत लिलया कॅच करतात आणि फस्त करतात. लॉंचेतील लहान मुलांना हा खेळ भरपूर आनंद देऊन जातो. हरखून गेलेल्या अशा वातावरणातच तासाभराचा हा सागरी प्रवास नकळत संपतो आणि आपण घारापुरी बेटाच्या काठाला लागतो. आपलं स्वागत करण्यासाठी आणि अर्थातच एलिफंटा लेण्यांच्या पायथ्याशी नेण्यासाठी तिथे एक मिनी ट्रेन सज्ज असते. सागराच्या लाटा झेलत-झेलत मिनी ट्रेन पुढे सरकू लागते आणि आपल्या देशाचा वैभवशाली भूतकाळ आपल्यासमोर उलगडू लागतो. एलिफंटा लेण्यांच्या निर्मितीचा काळ हा साधारण इसवी सन 900 ते 1300 च्या दरम्यान असावा असा अंदाज आहे. 1987 साली या लेण्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषीत केले. एका अखंड पाषाणात या लेण्या कोरण्यात आलेल्या आहेत. ज्या काळी पाश्चात्य देशांमध्ये मानवी वसाहतीचा मागमूससुद्धा नव्हता त्याकाळी आपल्या पुर्वजांनी इतक्या दुर्गम भागात इतकी अफाट कलाकृती कशी निर्मिली असेल, यावरच आपलं मन चिंतन करु लागतं. लेणी पाहून मन जितकं भरून येतं तितकंच ते अभिमानानं पुलकीतही होतं. या लेण्या म्हणजे मुर्तीकलेचा एक उत्तूंग नमूना आहे. मुख्य लेण्याच्या आत प्रवेश करताच समोर वीस फूट उंचीचे त्रिमुर्तीचे शिल्प दिसते. त्या मुर्तीच्या चेहऱ्यावरील शांत भाव पाहून आपलं मनही तशाच शांतीचा अनुभव घेऊ लागतं. याशिवाय लेण्यांमधील नटराज, योगेश्वरा आदी विविध शिल्पांना 'युनिक' म्हणता येईल इतपत वेगळेपण देण्यात आलं आहे. त्यावरील भावही 'युनिक' असेच आहेत.