Quantcast
Channel: Mumbai Hikers
Viewing all articles
Browse latest Browse all 3992

Article 0

$
0
0


"किल्ले अर्नाळा" - जलदुर्ग भ्रमंती २१ एप्रिल २०१३



गडवाट परिवार आपल्या सगळ्यांसाठी घेऊन येत आहे, सलग दुसरी जलदुर्ग मोहीम... 
किल्ले कुलाबा आणि किल्ले कोरलाई च्या भन्नाट अनुभवानंतर दुसरी मोहीम करत आहोत... 


किल्ल्याचा प्रकार : सागर किना-यावरील किल्ले (जलदुर्ग)

जिल्हा : ठाणे
श्रेणी : जास्त सोपी

हा किल्ला बांधण्याचा मुख्य हेतू:
अर्नाळा नावाच्या लहानशा बेटाच्या वायव्य दिशेस हा जलदुर्ग बांधला आहे. उत्तर कोकणातील वैतरणा नदी या किल्ल्याजवळ समुद्राला मिळत असल्यामुळे खाडीच्या सर्वच प्रदेशावर या जलदुर्गावरून नजर ठेवता येत असे.

किल्ल्याचा इतिहास:
चारही बाजूंनी पाण्याने वेढलेला अर्नाळा हा जलदुर्ग १५१६ मध्ये गुजरातचा सुलतान महमूद बेगडा याने बांधला. पोर्तुंगीजांनी १५३० साली हा किल्ला जिंकला व नंतर यावर अनेक नवीन बांधकामे केली. सुमारे २०० वर्षांच्या पोर्तुंगीज सत्तेनंतर हा किल्ला १७३७ मध्ये मराठ्यांच्या ताब्यात आला. पोर्तुंगीजांप्रमाणेच पहिल्या बाजीराव पेशवे यांनीही या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. शेवटी १८१७ मध्ये इतर किल्ल्यांप्रमाणेच हा किल्ला देखील इंग्रजांच्या ताब्यात गेला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
सागरात विस्तृत पसरलेले आणि झाडीने नटलेले अर्नाळ्याचे बेट आपल्याला उत्साहित करते. अर्नाळा किल्ला चौकोनी असून दहा मीटर उंचीची अखंड व मजबूत तटबंदी याचे संरक्षण करते. तटबंदीमध्ये असलेले बुरुज आजही ताठपणे उभे आहेत. किल्ल्याला एकूण तीन दरवाजे आहेत. याचा "मुख्यदरवाजा" उतराभिमुख आहे.

या महादरवाजा शिवाय गडाला अजून दोन प्रवेशद्वारेही आहेत. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन बुलंद बुरुज उभे आहेत. या दरवाजाच्या कमानीवर अत्यंत सुंदर नक्षीकाम असून दोन्ही बाजूला हत्ती व वाघाची प्रतिमा कोरलेली आहे.

प्रवेशद्वारावरच एक शिलालेख कोरलेला आहे... पण हा शिलालेख आपण तिकडेच जाऊन वाचायचा.. म्हणून इकडे मुद्दाम देत नाही आहे... :) ;)

किल्ल्याच्या आत त्र्यंबकेश्वराचे व भवानी मातेचे मंदिर आहे. त्र्यंबकेश्वर महादेवाच्या मंदिरासमोर एक सुबक बांधणीचे अष्टकोनी तळ आहे. या शिवाय किल्ल्यात गोड्या पाण्याच्या विहिरीही आहेत. किल्ल्याच्या सभोवार लोकांची वस्ती असून त्यांची शेतीही आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाकडे जातांना बाहेरच्या बाजूला कालिकामातेचे मंदिर आहे.समुद्रकिनार्‍यावरुन किल्ल्याकडे पाहिले असता डाव्या बाजूला असणारा किल्ल्यापासून संपूर्ण सुटा असा एक गोल बुरुज आपले लक्ष वेधून घेतो. याच्या आत जाण्यास एक लहानसा दरवाजा आहे.

किल्ल्याच्या मजबूत तटबंदीवरुन किल्ल्याचे सभोवार दर्शन घेत गोल फेरी मारता येते. मुख्य प्रवेशद्वाराच्या वर असणार्‍या उंचवट्यावर बसले असता पूर्ण किल्ल्याचा आवाका नजरेस पडतो.


=====================================

आपली "किल्ले अर्नाळा" जलदुर्ग भ्रमंती, रविवार दिनांक २१ एप्रिल २०१३ रोजी सकाळी ९ वाजता विरार स्टेशन (पश्चिम रेल्वे) येथून सुरु होऊन, संपूर्ण जलदुर्ग भ्रमंती करून, सायंकाळी ६ वाजता परत विरार स्टेशन (पश्चिम रेल्वे) येथे येऊन संपेल.

सदर मोहिमेचे शुल्क रु.१२०/- एवढे असेल.
(विरार ते अर्नाळा बस किंवा रिक्षा शुल्क आणि अर्नाळा गाव ते किल्ल्यावर जाण्यासाठी बोटीनेच जाण्याचे शुल्क व परतीचा प्रवास)


मोहिमेसाठी लागणारे साहित्य:
१) पाण्याची बाटली (२ लि.) -- आवश्यक
२) जेवणाचा डब्बा प्रत्येकाने स्वत: आणावा. -- आवश्यक
३) प्रवासासाठी उपयुक्त असे बूट
४) काही वर्तमानपत्रे जी बसण्यास उपयोगी येतील.
५) जर कोणते औषध चालू असल्यास सोबत ठेवावे..
६) सोन्याचे अथवा महागडे दागिने सोबत ठेवू नये... ठेवल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी स्वत:ची असेल.

=====================================

"गडवाट प्रवास सह्याद्रीचा" आयोजित "किल्ले अर्नाळा - जलदुर्ग भ्रमंती" या मोहिमेसाठी आपणास यायचे असेल तर खालील संपर्क क्रमांकावर संपर्क करून आपले नाव नोंदणी करणे बंधनकारक आहे. जर नाव नोंदणी झाली नसेल तर मोहिमे मध्ये सहभागी केले जाणार नाही याची नोंद्द घ्यावी.

संपर्क :
सुहास पवार : - ९००४०३६५७३ [9004036573]
जोतीराम गिड्डे :- ०९८६७२०६४४६ [9867206446]


http://www.facebook.com/gadwat

Viewing all articles
Browse latest Browse all 3992

Trending Articles