दुर्गदुर्गेश्वर रायगड प्रदक्षिणा ( दि. २७ डिसेंबर आणि २८ डिसेंबर २०१४)
रायगड हीच आमची पंढरी, आणि इथली माती हाच आमचा गुलाल-बुक्का !!
होय, "गडवाट.... प्रवास सह्याद्रीचा" आयोजित २०१४ च्या वर्षअखेरची एक भन्नाट भटकंती...
दुर्गदुर्गेश्वर रायगडाची प्रदक्षिणा आणि किल्ले रायगड दर्शन तसेच शिवचरित्रावर मार्गदर्शन
भेटण्याचे ठिकाण : राजमाता जिजाऊ मांसाहेब समाधी, पाचाड
दिनांक : शनिवार २७ डिसेंबर आणि रविवार २८ डिसेंबर २०१४
भटकंती शुल्क: रु. ८००/- फक्त (यामध्ये ३ वेळचे जेवण आणि ३ वेळचा चहा-नाश्ता तसेच रोप-वे चे शुल्क याचा समावेश असेल. )
संपर्क: सुहास पवार - ०९००४०३६५७३ / आबासाहेब कापसे: ०९८७०१४०११४
टीप :- नोंदणी फक्त फोनवरूनच निश्चित केली जाईल.(किंवा SMS करावा)
--------------------------
प्रवासाचा अंदाजित गोषवारा
दिनांक २७ डिसेंबर २०१४
==================
सकाळी ७:०० वाजता रायगड पायथ्याला, पाचाडला आऊसाहेबांच्या समाधीचे दर्शन,
चहा- नाश्ता घेऊन प्रदक्षिणेला सुरुवात...
दुपारचे जेवण - प्रदक्षिणेच्या मध्यावर
संध्याकाळी ५ ते ६ वाजे पर्यंत रोप-वे ने रायगड आरोहण
रात्रौ ७:३० वाजता शिवकालाचे अभ्यासक अजयदादा जाधवराव यांचे मार्गदर्शन
रात्री ९ ते १० पर्यंत जेवण आणि नंतर निवांत झोप
दिनांक २८ डिसेंबर २०१४
==================
सकाळी चहा - नाश्ता, त्यानंतर गडफेरीला सुरुवात,
दुपारी जेवण आणि त्यानंतर रोप-वे ने रायगड अवरोहण
संध्याकाळी ४ वाजता - राजमाता जिजाऊ मांसाहेब समाधी, पाचाड येथे पुन्हा भेट
राष्ट्रगीत आणि रायगड प्रदक्षिणेचा समारोप
(वेळेच्या शक्यतेनुसार वरील कार्यक्रमात अत्यावश्यक बदल करण्याचे हक्क गडवाट स्वत: कडे राखून ठेवत आहे.)
--------------------------
सोबत काय आणाल :-
१) खूप थंडी असल्याने स्वेटर आणि पांघरून -- अत्यावश्यक
२) पाण्याची बाटली (२ ते ३ लिटर) -- अत्यावश्यक
३) ओडोमोस, सुका खाऊ -- अत्यावश्यक
४) ट्रेकिंग शूज किंवा चांगली ग्रीप असेल असे शूज -- अत्यावश्यक
५) औषध चालू असल्यास ती सोबत असावीत.
६) ओळखपत्र
७) स्वत:च्या मौल्यवान वस्तूंची काळजी स्वत: घ्यावी.
--------------------------