किल्ले राजगड प्रदक्षिणा - २०१४ (वर्षं २९ वे)”
‘दी नेचर लव्हर्स’ आयोजित (गुरुवार दि. २५ डिसेंबर ते दि. २८ डिसेंबर २०१४)
आपल्या हृदयातील शिवप्रभुंच्या तेजोमयी विचार जागविण्यासाठी,
स्वाभिमानाने आपली मान उंच करण्यासाठी,
वैभवशाली मराठीशाहीच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी,
भव्य शिवमय अर्थातच “किल्ले राजगड प्रदक्षिणेत” सामील होण्यासाठी
आम्ही गर्वाने आपणांस आमंत्रित करत आहोत…!
"साहस हा पाया आणि निसर्गसंवर्धन हे ध्येय" हे ब्रीदवाक्य असलेल्या 'दी नेचर लव्हर्स, मालाड' या गेली ४० वर्षे गिर्यारोहण आणि निसर्गसंवर्धनाच्या क्षेत्रांत कार्यरत आहे.
प्रथम किल्ले राजगड प्रदक्षिणेचे आठ साहसवेडे, साक्षीदार व शिलेदार :
प्रजापती बोधणे, विनायक मुळीक, अनिल चव्हान, विजय जाधव, सुरेश वैद्य, किशोर सुर्वे, दत्ता कराडे व राजन बागवे या आठही शिलेदारांना "दि नेचर लव्हर्स" व “शिव प्रेमीं” यांस कडून मानाचा मुजरा !!!!
आई पद्मावती देवीच्या आशीर्वादाने, “दी नेचर लव्हर्स” या संस्थेतर्फे दरवर्षी किल्ले राजगड प्रदक्षिणा आयोजितकेली जाते. १० फेब्रुवारी १९८६ मध्ये मुंबईतील आठ साहसवेडय़ांनी प्रदक्षिणेचा हा घाट घातला आणि निसर्गाची खडतर आव्हानं पेलून तो यशस्वी केला. यंदा या प्रदक्षिणेचं (२९) एकोणतिसावं वर्षं आहे.
लोकांनी ट्रेकला यावे, निसर्गाच्या अधिक जवळ जावे, महाराष्ट्रातील गड-दुर्गाचे वैभव पाहावे आणि शिवराय समजून घ्यावे, यांसारख्याउद्देशाने काही ट्रेकिंग ग्रुपतर्फे वर्षांनुवर्षे विशेष मोहिमा राबविल्या जातात. मुंबईतील ‘दी नेचर लव्हर्स’ या ग्रुपतर्फे “किल्ले राजगड प्रदक्षिणा” मोहीम राबविली जाते. चार दिवसांच्या या मोहिमेमध्ये इतिहास अभ्यासकांच्या मार्गदर्शनाखाली किल्ले राजगड दर्शन तसेच “किल्ले राजगडाला” प्रदक्षिणा घातली जाते. त्यानंतर मोठय़ा थाटामाटात गडावर पारंपरिक पद्धतीने सोहळा करून मोहिमेची सांगता केली जाते. गतवर्षी या मोहिमेला “२८ वर्षे” पूर्ण झाली.
एखाद्या ट्रेकसारखी सुरू झालेली “किल्ले राजगड प्रदक्षिणा” गेल्या २८ वर्षात खूप बदलली आहे. ट्रेकच्या पलीकडे जाऊन तो एक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम बनला आहे. शिवशाहीच्या आठवणी जाग्या करणाऱ्या आणि श्री शिवछत्रपतींच्या पराक्रमाला मुजरा करणाऱ्या या उपक्रमाविषयी..
राजगड प्रदक्षिणा हा उपक्रम दरवर्षी राबवला जाऊ लागला आणि २८ वर्षं कधी सरली ते कळलंच नाही. आतापर्यंत जवळ जवळ ६,000 नागरिक प्रदक्षिणेत सहभागी झाले आहेत. त्यात १० वर्षं वयाची लहान मुलंही होती व ६५ वर्षांचे ज्येष्ठ नागरिकही होते. कालानुरूप प्रदक्षिणा कार्यक्रमात बरेच बदल करण्यात आले.प्रदक्षिणेचा मार्ग जास्तीत जास्त सुरक्षित करण्यात आला. वाटेत चेकपोस्टला पाण्याची व्यवस्था, गरम जेवण, लिंबूसरबत याची व्यवस्था होऊ लागली. प्रदक्षिणामार्गावर मदत पथक ठेवण्यात आलं. राजगड प्रदक्षिणेबरोबर गडदर्शन, देवीचा गोंधळ मर्दानी खेळ, गडजागरण, पालखी सोहळा, इतिहासतज्ज्ञांचं मार्गदर्शनअशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येऊ लागलं.
सुरुवातीला केवळ ट्रेकच्या रूपात असलेल्या या प्रदक्षिणेचं स्वरूप काही वर्षानंतर बदललं. महाराजांच्या या मावळ्यांनी पालखी सोहळा सुरू केला. नंतर दिंडी, दांडपट्टा, मशाल, जागर अशा कार्यक्रमांतून शिवकाळाला उजाळा देण्याचा प्रयत्न सुरू झाला. नेहमी ट्रॅक पँट आणि टी शर्टमध्येच संपन्न होणा-या ट्रेकचं रुपडंच या प्रदक्षिणेने बदलवून टाकलं. सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ट्रेकच्या सॅकमध्ये नऊवारी साडी किंवा सदरा, धोतर अशी पारंपरिक कपडेही भरले जाऊ लागले. एवढा मोठा सोहळा करायचा तोदेखील गडावर म्हणजे भलतीच तारेवरची कसरत असते. पण ‘नेचर लव्हर्स’चे मावळे आठ-पंधरा दिवस आधीपासूनच गडावर मुक्काम ठोकतात. प्रदक्षिणेच्या मार्गातील अडथळे दूर करणं,गरज असेल तिथे रोप बांधणं, गडावरची टाकी स्वच्छ करणं ही कामं गावक-यांचं सहकार्यानं अतिशय उत्साहाने करतात.
“दी नेचर लव्हर्स” गेली सलग २८ वर्षे पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातील किल्ले राजगडास प्रदक्षिणा घालण्याचा साहसी उपक्रम दी नेचर लव्हर्स, मालाड या संस्थेतर्फे राबविण्यात येत आहे. ‘गडांचा राजा आणि राजांचा गड’ म्हणून ओळखला जाणारा किल्ले राजगड पूर्वी मुरूंबदेवाचा डोंगर म्हणून ओळखला जात होता. या परिसराच्या रक्षणाच्या दृष्टीने या डोंगराचे भौगोलिक महत्त्व छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखले आणि त्याचे रुपांतर बुलंद अशा किल्ल्यात झाले.
मराठय़ांच्या पराक्रमाची गाथा ३५० वर्षाहून अधिक काळ सांगणऱ्या या ऐतिहासिक गडाला त्याच्या तटाखालून जंगलातून प्रदक्षिणा घालून “दी नेचर लव्हर्स” तर्फे छत्रपतींना मानाचा मुजरा करण्यात येत आहे. यंदा गुरुवार दि. २५ डिसेंबर ते दि. २८ डिसेंबर २०१४ या कालावधीत “किल्ले राजगडाला” प्रदक्षिणा घालण्यात येणार आहे. या चार दिवसांच्या कालावधीत इतिहास संकलक श्री. आप्पा परब व इतिहास अभ्यासक श्री. भगवान चिले मार्गदर्शन करणार आहेत. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची व्याख्यानं, पालखी सोहळा तसेच राजगडाची इतिहासकालीन माहिती याचेही आयोजन करण्यात आले आहे.
ट्रेकर मंडळींच्या शिवप्रेमाची गाथा इथेच संपत नाही. कोणताही ट्रेक असो, प्रवासादरम्यान किंवा कॅम्प फायरला रंगणारी गाण्याची मैफल- ‘शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती’, ‘जय जय महाराष्ट्र माझा’, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या गाण्यांशिवाय पूर्ण होतच नाही. इतकंच नव्हे, तर इतर मंडळी प्रवासाची सुरुवात ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने करतात. मात्र ट्रेकर मंडळींच्या ट्रेकची किंवा प्रवासाची सुरुवात ‘गो ब्राह्मण प्रतिपालक, राजाधिराज, योगीराज शिवछत्रपती महाराज.’ या घोषणेनेच होते. शिवाजी महाराज, त्यांचे गड-किल्ले, शिवगाथा ट्रेकर मंडळींच्या नसानसांतून वाहते आणि यापुढेही वाहत राहील….!
किल्ले राजगड प्रदक्षिणा कार्यक्रम २०१४ :-
1) गुरुवार २५ डिसेंबर : सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत किल्ले राजगड येथे प्रदिक्षणार्थीची नोंदणी,
दुपारी २.०० ते सायंकाळी ६.०० - किल्ले राजगड दर्शन, सायंकाळी ७.०० वा. पद्मावती देवीची आरती, सायंकाळी ७.३० संस्थेची माहिती व इतिहास अभ्यासक तज्ञाचे मार्गदर्शन
2) शुक्रवार २६ डिसेंबर : सकाळी ८ ते १२ व दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत किल्ले राजगड दर्शन, सायंकाळी ७.०० वा. पद्मावती देवीची आरती, सायंकाळी ७.३० संस्थेची माहिती व
इतिहास अभ्यासक तज्ञाचे मार्गदर्शन
3) शनिवार २७ डिसेंबर : सकाळी ६.०० वाजता चोर दिंडी (पद्मावती माची) पासून किल्ले राजगड प्रदक्षिणेची सुरुवात, गुंजवणे दरवाजा, सुवेळा माची, काळेश्वरी बुरुज, दुपारी अळू दरवाजा येथे भोजन, संजीवनी माची, पाली दरवाजा करून संध्याकाळी ६.०० वाजता चोर दिंडी (पद्मावती माची) येथे प्रदक्षिणा समाप्त.
संध्याकाळी : श्री छत्रपती शिवाजी महाराजांची पद्मावती मंदिर ते सदरे पर्यंत पालखी सोहळा
4) रविवार २८ डिसेंबर : प्रमाणपत्र वाटप, कार्यक्रमाची सांगता व राजगडाकडून प्रयाण.
प्रदक्षिणा कार्यक्रमाचं शुल्क मोठ्यांसाठी प्रत्येकी २५००/- रुपये तर शालेय विद्यार्थ्यांकरीता २३००/- रुपये असून न्याहारी, जेवण आणि राहण्याचा खर्च याचां समावेश असेल.
मुंबई-गुंजवणे-मुंबई प्रवास खर्च प्रत्येकी १०००/- रुपये असून दादर आणि कांदिवली येथून रात्री ११.०० वाजता बसेस सुटणार आहेत.
आपले संयोजक मंडळ :
एनएल रचना कुलकर्णी - ९८२१३४२७०२ (प्रमुख संयोजक)
एनएल शुभांगी चोरघे - ९८२१२५४०६५ (खजिनदार)
एनएल कक्षा खांडेकर - ९८६९५३०१३१ (सह-संयोजक)
एनएल राजन बागवे (मुंबई) ०२२ - २४१४७५७९
एनएल संजय खत्री (नाशिक) ९३७३९१८९४६
एनएल प्रमोद पाटील (कोल्हापूर) ९४२३२८५१५५
एनएल राजगोपाळ पाटील (पुणे) ९८२३३७६५५१ / ०२० - २२५३८४४७
एनएल ज्योती गुरव (बोरीवली) - ९८२१४५४०५७
एनएल नयना नलिनी (पनवेल) - ०२२ - २७४५१६९९
एनएल विरेंद्र डोळस (मालाड) - ९८९२६०५०७०
एनएल श्री संतोष घाडीगावकर (मुलुंड) - ९८६९४४९४८८
एनएल श्री शशांक म्हदनाक (ठाणे) - ९९३०७२४०४१ / ७३
OUR BANK DETAILS :
Account Holder Name : The Nature Lovers
Bank Name : Union Bank of India
Branch : Malad (West)
Account No. 318002010010443
IFSC Code : UBIN0531804
यांच्याशी संपर्क साधावा.
एनएल श्री. विनोद पाटील
दी नेचर लव्हर्स, (Assistant Field In-Charge) ९८९२६५८४७५
सोबत : किल्ले राजगड प्रदक्षिणा कार्यक्रम २०१४ फॉर्म (वर्ष २९ वे)