Quantcast
Channel: Mumbai Hikers
Viewing all articles
Browse latest Browse all 3992

Shivashourya Trekkers पन्हाळगड़ ते पावनखिंड-विशाळगड़ ऐतिहासिक पदभ्रमण मोहीम 10th July - 13th July 2014.

$
0
0
A Historical Trekking Expedition arranged by Shivashourya Trekkers from 10 July - 13 July 2014.

A walk from Fort Panhala to Fort Vishal via Pavankhind...
Informational Sight-seeing on Panhala with all the facts and a lecture on the historical developments by Shri. Shridutta Raut.

कार्यक्रमाचा तपशील
गुरुवार दि. १० जुलै २०१४ सकाळी ७ वा. पन्हाळगडावर आगमन आणि गडावरच मुक्काम. इत्यंभूत माहितीसह पन्हाळगड दर्शन आणि पन्हाळगडाच्या शेजारी असलेला पावनगड दर्शन. सायंकाली मुक्कामाच्या ठिकाणी जमलेल्या सर्व शिव प्रेमींची ओळख होऊन पन्हाळगड ते विशाळगडाच्या ऐतिहासिक रणसंग्रामाची पार्श्वभूमि इतिहास अभ्यासक श्री. श्रीदत्त राऊत कथन करतील. मोहिम प्रमुख श्री. योगेश शिरसाट दुसर्‍या दिवशी सुरु होणार्‍या ट्रेकची माहिती दिली देतील.

शुक्रवार दि. ११ जुलै २०१४ सकाळी ८.३० वाजता पन्हाळगडावरील नरवीर शिवा काशिद आणि नरवीर बाजीप्रभु यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आपल्या ऐतिहासिक पदभ्रमण मोहिमेची सुरुवात होइल. आपल्या मोहिमेचे मार्गक्रमण त्याच मार्गावरून होइल ज्या मार्गाने शिवाजी महाराज निसटले.

दुपारी आपण खोतवाडी येथे मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यावर विश्रांती तसेच गावात फेरफटका किंवा फोटोग्राफी करण्यासाठी वेळ असेल.

शनिवार दि. १२ जुलै २०१४ सकाळी ७.०० वाजता पुढील मुक्काम म्हाळसवडे गावाच्या दिशेने ट्रेकला सुरुवात. संध्याकाळी म्हाळसवडे येथे पोहोचल्यावर विश्रांती.

रविवार दि. १३ जुलै २०१४ सकाळी ६.०० वाजता पावनखिंडिकड़े प्रस्थान. रणक्षेत्रावर हौतात्म्य पत्करलेल्या बाजी आणि त्यांच्या शुर बांदलवीरांना श्रद्धांजलि अर्पण करून विशाळगडाकडे प्रस्थान. दुपारी विशाळगडावर मोहिमेची सांगता. रात्री बसने परतीचा प्रवास सुरु.

टिप : सदर मोहिम शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मार्गावरून मार्गक्रमण करत असल्याने मोहिमेत कसल्याही प्रकारचे व्यसन, गैर बोलू अथवा गैर वागू दिले जाणार नाही, ह्याची सहभागी होणार्यानी नोंद घ्यावी. आपली मोहिम ही मौज मजेसाठी निघालेली पिकनिक नसून शिवप्रेमींची ही "पंढरीची वारीच" आहे. निसर्गावेड्या माणसाला स्वतःचा विसर पडावा अशी निसर्गाची विविध रुपे अनुभवायला मिळणार आहेत. अनेक आयुर्वेदिक पाना-फुलातून, मूळ-खोडातून खळखळ वाहणारे पाणी अमृताहून सरस आहे. शहरातील रस्त्यांच्या दुभाजकावर स्वतःला सावरत चालताना होणारा त्रास इथे शेताच्या बांधावरून चालताना होणार नाही. ओढयातून चालताना पडल्यावर आपल्या नावाने "गणपति बाप्पा मोर्याची" आरोळी पुढील काही दिवस आपल्या कानात घूमत राहातेच पण अनेक वर्ष ट्रेकच्या आठवणींचा हिस्सा होते.
इतिहासाबरोबर सामाजिक बांधिलकी जपण्याची "शिवशौर्य ट्रेकर्सची" परंपरा आहे त्यानुसार मुक्कामात शालेय विद्यार्थांना शैक्षणिक साहित्याचे शक्य असेल तसे वाटप केले जाते. आपल्यालाही आम्ही आवाहन करीत आहोत की तुमच्या घरी नुसतेच पडून असलेले शैक्षणिक साहित्य उदा. पेन्सिल्स, पेन, वही, चित्रकलेचे साहित्य, गोष्टीची पुस्तके आवर्जून आपल्या ग्रामीण बान्धवांसाठी घेऊन या. आपला हा ट्रेक संस्मरणीय असेल.

ट्रेक फी : रु. 1150/- (फक्त मोहिमेचा खर्च) पन्हाळगड पर्यंत येण्यासाठी तसेच विशाळगडाहून परतीच्या प्रवासाची सोय या बाबत आयोजकांशी चर्चा करावी.
नाव नोंदणीची अंतिम तारीख २ जुलै, २ जुलै नंतर ट्रेक फी : रु. 1350/- असेल
आजीव सदस्यांना ट्रेक फी : रु. 1050/- असेल

ट्रेकसाठी लागणारे साहित्य
१) दोन्ही खांद्यावर घेता येईल अशी १ मोठी सॅक आणि १ छोटी सॅक, सामान कमीत कमी आणावे.
२) चांगल्या प्रतीचे बूट, मोजे, एक्स्ट्रा चप्पल, रेनकोट, जरुरी पुरते कपडे (कपड्यांचे फक्त २ सेट), टूथब्रश टूथ पेस्ट, साबण, टॉवेल,
३) जेवणासाठी ताट, वाटी, पेला, चमचा, पाण्याची १ लिटर बाटली, टिफिन बॉक्स (रोजचा pack lunch घेण्यासाठी).
४) अंथरुण, पांघरुण, आपल्या आकाराची प्लास्टिक शीट, टॉर्च, कॅमेरा.
५) व्यक्तिगत औषधे जवळ बाळगावीत, zole-F (ओल्या कपड्यांमुळे त्वचा काचते) हे औषध आवश्यक
६) महत्त्वाची सूचना : - वरील सर्व सामान छोट्या छोट्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून त्या सर्व पिशव्या एका मोठ्या प्लास्टिक पिशवीत भरा जेणेकरून पावसात सॅकच्या आतील सामान सुके राहिल.

अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकांवर सम्पर्क साधावा.
मुंबई-अमित - 9320 755 539 / शार्दुल - 9967 493 532
पुणे-ऋतुराज पटवर्धन - 9767 973 419,
ठाणे-प्रथमेश म्हात्रे - 9930 451 178
नाशिक- योगेश शिरसाट - 9970626269
नागपूर-मोहन बेडेकर - 9823 174 870

Bank Details : - Bank of Maharashtra (Prabhadevi Branch)
A/c. No. 60134804616, IFSC Code : MAHB0000318, Branch Code : 000318
A/c. Name : SHIVASHOURYA TREKKERS
बँकेत शुल्क भरल्यावर 9320 755 539 या क्रमांकावर लगेच कळवावे.
शुल्क प्राप्त झाल्याचे SMS मधून लगेचच कळवले जाईल

ईमेल : shivashourya.trekkers@gmail.com
फेसबुक : https://www.facebook.com/ShivashouryaTrekkers/photos_albums
ब्लोगर : www.shivshouryatrekkers.blogspot.com
पिकासावेब : https://picasaweb.google.com/shivashourya.trekkers

Viewing all articles
Browse latest Browse all 3992

Trending Articles