Quantcast
Channel: Mumbai Hikers
Viewing all articles
Browse latest Browse all 3992

Durgasakha trek to sudhagad on 17 18 june 2014

$
0
0
दुर्गसखा आयोजित आपला इतिहास आणि इतिहासाची जपणूक "पद्मदुर्ग आणि जंजिरा" जलदुर्गभ्रमण इतिहास संशोधक सचिन जोशी सरांसोबत  येत्या  १७-१८ मे २०१४ रोजी

ठाण्यातील दुर्गसखा या संस्थेतर्फे दि. १७-१८ मे २०१४ रोजी "पद्मदुर्ग आणि जंजिरा" येथे जलदुर्गभ्रमण आयोजित केले आहे. दि १७ मे २०१४ रोजी रात्री १२ वाजता ठाण्याहून प्रस्थान पद्मदुर्ग  येथे आणि तेथे गडफेरी, साफसफाई, अशी दुर्ग संवर्धन मोहीम आयोजित केली आहे.

इतिहास :-

"पद्मदुर्ग" :- छत्रपती शिवाजी राजांनी बांधलेला हा किल्ला आजही सुस्थितीत उभा आहे. शिवरायांच्या शब्दात सांगायचे तर ‘पद्‌मदूर्ग वसवून राजापूरीच्या (जंजिरा) उरावरी दुसरी राजापूरी केली आहे’. असा हा सुंदर किल्ला एकदा तरी वाकडी वाट करुन पाहावा असा आहे.

"जंजिरा":- १६१८ ते १६२० च्या कालावधीत सिध्दी सुरुदखान हा ठाणेदार झाला. यानंतर सुमारे १९४७ पर्यंत २० सिध्दी नवाबांनी जंजिरा किल्ल्यावर हक्क गाजवला. मुरुड परिसरातून मिळणारे उत्पन्न आणि खर्च यांची सांगड बसत नसल्याने मलिक अंबरने हा मुलूख तोडून देऊन याठिकाणी नवीन जहागीरदारी स्थापन केली आणि सिध्दी अंबरसानक या मुलूखाची जबाबदारी पाहू लागला. अर्थात या जंजिरा संस्थानाचा संस्थापक सिध्दी अंबरसानकच ठरला.
इ.स १६२५ मध्ये मलिक अंबर मरण पावला जंजिरेकर स्वतंत्र सत्ताधीश झाले होते. २० सिध्दी सत्ताधिशांनी मिळून ३३० वर्षे राज्य केले आणि १९४८ मध्ये जंजिरा संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झाले.

काय पाहाल :- कमळाच्या आकाराचा भव्य बुरुज , बुरुजाच्या आत असलेले तटबंदीत कोठार , तटबंदीला लागून असलेली पडकी वास्तू , दोन हौद व त्यामधील थडग आणि अनेक तोफा. पीरपंचायतन,घोड्याच्या पागा,सुरुलखानाचा वाडा,तलाव, सदर, तसेच सर्वात मोठी तिसरी तोफ हे सारे जंजिरा येथे पाहण्यास मिळते.

दुर्गभ्रमण आराखडा :-


(शनिवार १७ मे २०१४)
रात्री . १२:०० : ठाणे येथील mango शोरूमपाशी भेट व तेथून  प्रस्थान.
(रविवार १८ मे २०१४)

सकाळी ५:०० : काशीद येथे पोहचून थोडी विश्रांती अन नाष्टा
सकाळी ६:३० : पद्मदुर्गकडे प्रस्थान

७ ते ९:०० : गडफेरी, गडइतिहास  व साफसफाई

०९:३०: पद्मदुर्ग पाहून जंजिरेकडे प्रस्थान

११ ते १२:३० जंजिरा गडफेरी, गडइतिहास

दु १:००:- काशीद गावाकडे प्रस्थान

दु. १:३० ते ३:०० भोजन

४:००: ठाण्याकडे प्रस्थान

शुल्कः रू. १५०० /-  (नाष्टा, भोजन व प्रवास खर्चासहित.)


सोबत आणावयाच्या वस्तू :- एक शोल्डर बॅग, चांगली पादत्राणे - बूट असल्यास उत्तम, टॉर्च,२ लिटर पाण्याची बाटली, वैयक्तिक औषधे इ.

नियम व अटी :
* दुर्गभ्रमणादरम्यान धुम्रपान व मद्यपान यांस सक्त मनाई आहे. * सभासदांच्या मौल्यवान वस्तूंची जबाबदारी संस्थेकडे राहणार नाही. * वेळापत्रक पाळण्याचा पूर्ण प्रयत्न संस्थेतर्फे केला जाईल परंतू काही अकल्पित प्रसंग कार्यक्रमात तातडीचे बदल करण्यास भाग पाडू शकतात. अशावेळी सभासदांचे सहकार्य अपेक्षित आहे.

सूचना :- सर्वांनी वेळेच्या १५मिनिट आधी यावे, कुणाला उशीर झाल्यास वेळ चुकवता येणार नाही, तसेच सर्वांनी दिनांक १५-०५-२०१४ तारखेच्या आत आपले नावे नोंदवावी. नाव नोंदवून परत काढल्यास भरलेली रक्कम परत केली जाणार नाही.

डोनेशनट्रेकसाठीची वर्गणी खालील खात्यात जमा करावी.




नाव : सुबोध सुरेश पाठारे.

बॅंकेचे नाव : सिटि बॅंक

शाखा : ठाणे

खाते क्रमांक : 5699780113

आय एफ एस सी कोड : CITI0100000

संपर्क:
सुबोध पाठारे: ९७७३५३७५३२ / SUBODH PATHARE :9773537532,    (ठाणे पश्चिम  )
मनोज चव्हाण :९७७३४२११८४/ MANOJ CHAVAN:9773421184 , (ठाणे पूर्व )
अभिजित काळे: ९९२०२४११८३/ ABHIJEET KALE :9920241183,      (ठाणे , खारेगाव )
चेतन राजगुरू:  ९६६४९४१३८१/ CHETAN RAJGURU:9664941381, (डोंबिवली)
मकरंद केतकर ९६६४५३५०६७ / MAKARAND KETKAR : 9664535067.    (पुणे)

या जलदुर्गभ्रमणातून मिळणारा पूर्ण निधी हा "पेंढारी विद्यामंदिर"  बांधकामासाठी वापरला जाणार आहे. "एका आनंद आपण घेतल्यावर आपण ३ जणांना आनंद देणार आहात . "




Regards
Subodh Suresh Pathare
9773537532
www.durgasakha.org

Viewing all articles
Browse latest Browse all 3992

Trending Articles