जनसेवा समिती,विलेपार्ले आयोजित, “महाराष्ट्रातील अपरिचित दुर्गरत्ने” मित्रांनो आणि मैत्रिणिनो, आपणास विदित असेल की गतवर्षी जानेवारी महिन्यात आपण शिवरायांच्या प्राणप्रिय अश्या गिरीदुर्गांच्या छायाचित्रांचे एक भव्य प्रदर्शन आयोजित केले होते.या प्रदर्शनीला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. या वर्षीही आपण असेच प्रदर्शन भरवण्याचे ठरवले आहे. या प्रदर्शनातही आपल्या कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी काढलेली गड-कोट-किल्ल्यांची छायाचित्रे प्रदर्शित करण्यात येणार आहेत. या वेळी मात्र “अपरिचित किल्ले” अथवा “Less Frequented Forts” ही संकल्पना असून या निवेदनाद्वारे संस्थेच्या समस्त कार्यकर्ते, हितचिंतक यांना आवाहन करण्यात येत आहे की वरील विषयावर आधारित आपण काढलेली जास्तीत जास्त छायाचित्रे आमच्याकडे पाठवावीत. त्यातून निवडलेल्या छायाचित्रांचे भव्य प्रदर्शन शनिवार आणि रविवार, दि. २५ -२६ जानेवारी २०१४ रोजी विलेपार्ले येथे भरवण्यात येईल. सदरहू प्रदर्शन, “महाराष्ट्रातील अपरिचित दुर्गरत्ने” या नावाने अयोजीत केले जाणार आहे. निवडलेल्या चित्रांचे प्रदर्शनास योग्य आकारात तयार करण्याचा खर्च संस्थेतर्फे केला जाईल.प्रदर्शनात मांडलेल्या छायाचित्रांसाठी आपल्याकडून शुल्क घेण्यात येणार नाही अथवा निवडलेल्या चित्रासाठी आपणास कोणतेही मानधन मिळणार नाही याची आपण कृपया नोंद घ्यावी. प्रदर्शनीचे ठिकाण लवकरच कळवण्यात येईल. प्रदर्शनात भाग घेण्यासाठी कृपया खालील व्यक्तींशी लवकरात लवकर संपर्क साधावा... पराग लिमये ९९८७५६५७३८ अमोल मांडके ९००४६५७६६३ सनेश परब ९८६९१५१११३ कळावे. आपला कृपाभिलाषी, पराग लिमये कार्यवाह-जनसेवा समिती,विलेपारले
↧