पनवेल येथील निसर्गमित्र या संस्थेने धाडसी ट्रेकर्स व निसर्गप्रेमींना मोहवणारा, चित्तथरारक असा अलंग-मदन-कुलंग चा ट्रेक २६ ते २९ दिसेम्बेर २०१३ मधे आयोजित केला आहे.
आकाशचुंबी कळसूबाई शिखर व तिच्या
पर्वतरांगेच्या शेवटी आपलं कातळटोक उंचावून दाखवणारा उत्तुंग कुलंग दूर्ग आणि त्याच्या शेजारी ओबडधोबड उभट आकाराचा मदनदूर्र्ग असा नजारा आपल्याला नाशिकहून मुंबईला जाताना घोटीपासून डाव्या हाताला दर्शन देतो. वातावरण स्वच्छ असेल तर मदनदूर्गाच्या माथ्याला असलेलं नेढं हायवेवरूनदेखील व्यवस्थित दिसतं.
सह्यादीतली सर्वात खडतर डोंगरयात्रा म्हणून अलंग-मदन-कुलंग या दूर्गत्रिशुळाची यात्रा ओळखली जाते. या
दूर्गत्रिशुळाचा मधला फाळ असलेला दूर्ग मदन या त्रिकुटातही खडतर म्हणून स्वत:ची ओळख राखून आहे. त्यामुळेच प्रत्येक कसलेला गिर्यारोहक त्याच्यावर झेंडा रोवायला आसुसलेला असतो.
*अधिक माहितीसाठी व आपले नाव नोंदवण्यासाठी संपर्क
:-
पराग सरोदे-९६९९९९८२४८
विनायक कानिटकर-८६९२९२६४१४
विश्वेश
महाजन-९०२९५३५२१८
धनंजय मदन-९९८७२९०७५९
REGARDS.
DHANANJAY MADAN
9987290759